ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची आई फोनवर काय म्हणाली?

आरोपी कडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई : सैफ अली खान याला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता सैफ अली खान याच्या प्रकरणात मध्यरात्री मोठे बदल झाली आहेत. सैफ हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. सैफ याच्या प्रकरणाची जबाबदारी पीआय अधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे होती, पण आता अभिनेत्याच्या प्रकरणाचा तपास अजय लिंगानुरकर करणार आहेत. मात्र, मध्यरात्री जुन्या तपास अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय का घेण्यात आला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आरोपीचं बंगाल कनेक्शन?
सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीचा सीम कार्ड जप्त करण्यात आला आहे. सीम कार्ड कोलकाता, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या खुकुमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होते. हे सिम कार्ड 23 मार्च 2024 रोजी सक्रिय करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलमधून काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत… अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

 

हेही वाचा  :  सोनं व चांदी खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे दर 

आरोपीला 5 दिवसांची पोलीस कस्टडी
सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मुंबई पोलिसांनी नुकतेच अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. तेव्हा न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 35 हून अधिक पथके तयार केली होती.

काय म्हणाली आरोपीची आई?
हल्ल्याचा आरोपी शहजादकडून घटनेच्या वेळी घातलेले कपडे आणि इअरफोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी शहजादच्या फोनवरुन त्याच्या आई वडिलांना फोन केला होता. तेव्हा माझा मुलगा आरोपी आहे… असं आरोपीच्या आईने सांगितलं. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button