सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा रुग्णालयातील फोटो शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय पोस्ट
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रचंड दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे
![Saif Ali Khan, Kareena Kapoor, Hospital, Shatrughan Sinha, attack, heavy, sorrow, misfortune,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/kareena-and-saif-780x470.jpg)
मुंबई : गुरुवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सैफ याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून ठाणे येथून शनिवारी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान सैफ याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचत आहेत. तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त करत आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील घडलेल्या घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
पोस्ट शेअर करत शत्रुघ्न सिन्हा यांनी एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर रुग्णालयात असल्याचं चित्र दिसत आहे. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी पोस्ट केलेला फोटो फेक असून एआय जनरेटेड आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत शत्रुघ्न सिन्हा यांना ट्रोल केलं.
Statement: संकटात आहे सैफ, मुंबई आहे ‘सेफ’ !
फोटोमुळे सोशल मीडियावर नाराजीचं वातावरण पाहता शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो डिलिट केला आणि फक्त पोस्ट शेअर केली. एवढंच नाही तर, ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीचे कौतुक केलं आणि आभार मानले. यासोबत त्यांनी सैफला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ट्विट करत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रचंड दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. देवाचे आभार मानतो त्याची प्रकृती स्थिर आहे. एक नम्र आवाहन कृपया ‘ब्लेम गेम’ थांबवा, पोलीस आपले काम चोख करत आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण नक्कीच कौतुक करतो.
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, प्रकरण लवकर निकाली लागेल, जितकं लवकर होईल तितके चांगलं. सैफ हा सर्वात तेजस्वी स्टार, अभिनेता आणि पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. सध्या शत्रुघ्न सिन्हा यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.