रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
![Ritesh-Genelia film Ved entered the Guinness Book of World Records](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/riteish-deshmukh--780x470.jpg)
मुंबई : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे.
सत्या आणि श्रावणीला प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला आहे. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
हेही वाचा – UPSC/ MPSC संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
GUINNESS WORLD RECORDS for Ved, a moment we will never forget! @StarPravah has created magic for the world television premiere of Ved, a truly special film for both Genelia and me! pic.twitter.com/4jDseRUwOQ
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 11, 2023
अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की, स्टार प्रवाह वाहिनीने वेड चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत.