‘राजा राणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरजने एकाचा जीव वाचवला
सुरज लवकरच केदार शिंदे यांच्या चित्रपटातही दिसणार
!['Raja Rani', film, shooting, Suraj, Jeev, Saved, Kedar Shinde, film,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/suraj-chavan-2-780x470.jpg)
मुंबई : ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सुरज चव्हाण याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या साधेपणामुळे महाराष्ट्राने त्याच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच तो ‘बिग बॉस मराठी ५’ चा महाविजेता ठरला. त्याने काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिची भेट घेतली होती. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता त्याच्या हिमतीचा आणि उदारपणाचा एक किस्सा समोर येतोय. त्याने चक्क स्वतःचा जीव धोक्यात घालून एका व्यक्तीचा जीव वाचवला होता. अभिनेता तानाजी गलगुंडे याने हा किस्सा सांगितला आहे.
सुरज ‘राजा राणी’ या चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात तो सहकलाकाराचा भूमिकेत आहे. त्याच्या सोबतच ‘सैराट’ चित्रपटातील लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गलगुंडे देखील आहे. त्यांनी नुकतीच सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत तानाजीने सूरजचा एक किस्सा सांगितला आहे. ‘राजा राणी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरजने एकाचा जीव वाचवला होता. तानाजी म्हणाल, ‘आम्ही पोहत होतो. एका तळ्याच्या कडेला शूट सुरू होतं. पोहोता पोहोता एक लाइटवाला आमचा पोरगा होता. तो पण तळ्यात पोहायला गेला. तो पोहोत पोहोत खूप लांब गेला. लांब गेला आणि मध्ये जाऊन गटांगळ्या खायला लागला. त्याची एनर्जीचं संपली. मग सुरज गेला पळत पळत, पोहत पोहत आणि त्या मुलाला त्याने मरता मरता वाचवलं, कडेला आणलं.’
त्यानंतर ‘राजा राणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी ढोलताडे म्हणाले, ‘ तो सीन पूर्ण झाला होता. मी आणि डीओपी तिथेच बसलो होतो. आम्ही खूप लांब होतो. मला तो मुलगा बुडताना दिला. माझ्याकडे माइक होता. मी माइकवर सांगितलं तो बुडतोय. सुरजने सगळ्यात आधी ऐकलं आणि डायरेक्ट पाण्यात उडी मारली.’ सुरज लवकरच केदार शिंदे यांच्या चित्रपटातही दिसणार आहे.