पंजाबी सिंगर आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालचा संघर्षमय प्रवास
पैशांसाठी अभिनेत्याने केली धुणीभांडी, केल्या 3 नोकऱ्या
![Punjab, Singer, Actor Gippy Grewal, Struggle, Travel, washing, dishes,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/panjabi-singer-780x470.jpg)
पंजाब : झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आयुष्याची सुरुवात शुन्यापासून केली. पण या संघर्षात त्यांना साथ मिळाली ती म्हणजे पत्नीची नुकताच एका अभिनेत्याने जुन्या आठवणी ताज्या करत पत्नीने केलेल्या सहकार्याबद्दल सांगितलं आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पंजाबी सिंगर आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल आहे. गिप्पी ग्रेवार आज झगमगत्या विश्वातील फार मोठं नाव आहे.. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभिनेत्याने मोठा संघर्ष केला आहे
एका मुलाखतीत गिप्पी याने बायको दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी गिप्पी ग्रोवाल याने तीन नोकऱ्या केल्या. गिप्पी म्हणाला, ‘एक काळ असा होता, जेव्हा मी तीन नोकऱ्या करायचो. पण फार काही कमाई होत नव्हती आणि पंजाबमध्ये अनेक गायक आहेत. ज्यांच्यावर कंपनीने आता गुंतवणूक करणं बंद केलं.
अल्बम्स प्रचंड महागड्या झाले होते. प्रत्येक कलाकाराला सांगितलं जायचं की, तुझ्यामध्ये कौशल्य आहे, पण कंपनी गुंतवणूक कशी करेल, यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. घरुन पैसे घेण्याची तेव्हा पद्धत नव्हती. त्यामुळे स्वतः काम करुन पैसे कमवावे लागत होते. पण कठीण काळात माझ्या पत्नीने माझी साथ सोडली नाही.
माझ्या बायकोने देखील 3 नोकऱ्या केल्या. कारण कॅनडामध्ये कुटुंबाची भूक भागवायची होती. त्यामुळे तिने देखील प्रचंड मेहनत घेतली. मी 3 नोकऱ्या करायचो. सकाळी मी लोकांच्या घरी न्यूजपेपर टाकायचो. त्यानंतर 8 -9 तास एका फॅक्ट्रीमध्ये काम करायचो, प्रचंड कठीण काम होतं. रात्री मी आणि माझी बायको सफाईचं काम करायचो.
‘झाडू, फर्शी, धुणीभांडी… हे काम आम्ही एका मॉलमध्ये करायचो. मी दिवसा काम करयचो तेव्हा बायको सब्वेमध्ये सँडविच तयार करायची. बाकी राहिलेली कामं आम्ही दोघे वाटून घ्यायचो. पण तेव्हा देखील आयुष्याचा आनंद घेतला,’ असं देखील अभिनेता म्हणाला.