Bigg Boss 16 : पुण्याचा MC STAN ठरला ‘बिग बॉस १६’ चा विजेता..!
![Pune's MC STAN became the winner of Bigg Boss 16..!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/mc-stan-780x470.jpg)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने केली घोषणा..
Bigg Boss 16 : सर्वाधिक लोकप्रसिद्ध असलेल्या बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. यंदाच्या बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेता सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. यंदा बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एम स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भागोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
यावेळी सर्वप्रथम एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम ही बाहेर पडली. यामुळे शिव ठाकरे, एमसी स्टेन, प्रियांका चहर चौधरी हे तीन जण बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले. यानंतर सलमान खानने टॉप २ सदस्य म्हणून शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांच्या नावाची घोषणा केली. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
शिव ठाकरे आणि एमसी स्टेन यांना मंचावर येण्यास सागितले. त्यानंतर सलमान खानने एमसी स्टेनची बिग बॉस हिंदी १६ व्या पर्वाचा विजेता म्हणून घोषणा केली. त्यामुळे मराठमोळ्या शिव ठाकरेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एमसी स्टेनला बिग बॉसची ट्रॉफी आणि त्याचबरोबर ३१ लाख ८० हजार रूपये ही रक्कम मिळाली.