प्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला पुनावळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवनाथ ढवळे यांचा पुढाकार : अधिरा इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात रंगली फैफील
पिंपरी | पुनावळे येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला. यामधे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे-शिंदे व गायक आशुतोष सुरजुसे यांची संगीत मैफिल झाली.
कार्यक्रमात भक्तीगीते, भुपाळी गीते, भारूड सादर करण्यात आली. पुनावळेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी खूप गर्दी केली. महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. त्यांनी जीवनावर आधारित कविता सादर केल्या. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – राज्यात पुन्हा संधी मिळाली तर आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांचया पुढाकाराने अधिरा इन्टरनॅशनल स्कूल कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी मुख्याध्यापिका सुनिता फडके, महावीर महाराज सूर्यवंशी, किशोर चित्राव, सुरेश रानवडे, ज्ञानदेव काटे, संतकाका, बाबामहाराज गवारी, सुनिल ढवळे, राहूल काटे, पुनावळे ग्रामस्थ व हौसिंग सोसायटी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.