प्राजक्ता माळी लवकरच अडकणार लग्नबंधनात… इंन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ शेअर करत दिली हिंट
![Prajakta Mali will soon get stuck in a marriage… Sharing a video on Instagram gave a hint](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Prajktaji-mali.jpg)
मुंबईः मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. प्राजक्ता माळीने मालिकांपासून चित्रपटांपर्यंत सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ता माळीने ‘रानबाजार’ या वेबसीरिजमधून धुमाकूळ माजविला होता. या वेब सीरिजमधील प्राजक्ताच्या भूमिकेवर प्रचंड चर्चा झाली होती. तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा देत तिचं कौतुक केलं होतं. तर काहींनी तिच्यावर टीका केल्या होत्या. प्राजक्ता चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. सध्या प्राजक्ता माळीची एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत अपडेट्स देत असते. सध्या प्राजक्ताची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात फक्त एका मुलीचे पाय आणि पैंजण दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने ‘हिंट’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरून अनेकांना प्राजक्ता साखरपुडा किंवा लग्न करतेय का? असा प्रश्न पडला आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर करत हिंट असं कॅप्शन जरी दिलं असलं, तरी काही स्पेस सोडून अभिनेत्रीने लिहलंय, ‘ नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही…त्यासाठी “वाट बघा”. त्यामुळे अभिनेत्री साखरपुडा किंवा लग्न तर इतक्यात करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चाहत्यांना त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. परंतु अभिनेत्रीची ही पोस्ट नक्की कशाबाबत आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ताची पोस्ट पाहून ती लवकरच एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचं लक्षात येत आहे. साडी आणि पायात पैंजण यावरुन प्राजक्ताचा पारंपरिक लुक असणार असं दिसून येत आहे. चाहते प्राजक्ताच्या या नव्या प्रोजेक्टबाबत जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अभिनेत्रीने उद्या 5.30 वाजता इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून याबाबत माहिती देणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्राजक्ता उद्या कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्राजक्ता माळी एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. प्राजक्ता एक कवयित्रीसुद्धा आहे. तिने स्वतःचा एक कवितासंग्रहही प्रकाशित केला आहे. प्राजक्ता मालिका असो किंवा चित्रपट नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत असते. सोबतच ती महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालनसुद्धा करते. अभिनेत्रीच्या या पोस्टने मात्र सर्वांचींच उत्कंठा वाढवली आहे.