आमदार प्रकाश सुर्वेच्या दहीहंडीत गौतमी पाटीलची हजेरी
दहीहंडीत गौतमी पाटीलचा कचकच कांदा.. या गाण्यावर तुफान डान्स
![MLA, Prakash Surve, Dahi Handi, Gautami Patil, Attendance, Kachkach Onion, Toofan, Dance,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/prakash-surve-780x470.jpg)
ठाणे : सबसे कातिल गौतमी पाटीलचे महाराष्ट्रात तुफान चाहते आहेत. अशातच दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटीलची मुंबईत हजेरी पाहायला मिळाली. मुंबई उपनगरातील दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत गौतमी पाटीलनं कचकच कांदा.. या गाण्यावर तुफान डान्स करत गोविंदा पथकांसह प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. इतकंच नाहीतर गौतमी पाटीलने प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी सोहळ्यात जबरदस्त डान्स करत यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर गोविंदांशी संवाद साधला.
गौतमी पाटीलने आपलं नृत्य करताना भर मंचावर आयोजकांसमोरच शड्डू ठोकला आणि दंड बैठकाही मारल्याचे पाहायला मिळाले. गौतमी पाटीलच्या या जबरदस्त नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील साद देत गौतमी पाटीला प्रतिसाद दिला. मी ऑल महाराष्ट्र शो करत असते. मुंबईची गोष्टच वेगळी आहे. लव यू मुंबईकर’ असं गौतमी पाटीलने म्हटलं.