Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू बनली 2021 ची विश्वसुंदरी
![Miss universe 2021: India's Harnaz Sandhu became Miss World 2021](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/harnaaz-sandhu-Miss-universe.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
‘मिस युनिव्हर्स 2021’ या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चंदीगड गर्ल हरनाज संधू हिला अखेर 2021चा मिस युनिव्हर्स (Miss universe 2021) किताब मिळाला आहे . इस्रायलमध्ये 12 डिसेंबर रोजी 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये तीन देशातील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यात भारताच्या हरनाज संधूचाही (Harnaz Sandhu) समावेश होता. या तीन देशांपैकी दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वे या दोन्ही देशातील मॉडेल्सना मागे टाकून भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरी मुकुट पटकावला आहे.
याआधी देखील 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021’ (Miss Diva Miss Universe India 2021) किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70 वं वर्ष आहे. दरम्यान या सोहळ्याचा भाग होण्यासाठी दिया मिर्झाही भारतातून आली होती.