OTT | ‘या’ आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार अनेक चित्रपट आणि वेबसिरीज, पाहा यादी
![Many movies and webseries releasing on OTT this week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/OTT--780x470.jpg)
OTT | ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यंदाच्या आठवड्यामध्ये (१५ जानेवारी ते २१ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला अनेक चांगले चित्रपट आणि वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेगवेगळ्या आशयांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. चला तर जाणून घेऊया, या आठवड्यात रिलीज होणार्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल..
‘इंडियन पोलिस फोर्स’ : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरीज ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’ १९ जानेवारीला रिलीज होईल.
हेही वाचा – मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री एकाच गाडीत, व्हिडीओ व्हायरल
‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन’ : ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन’ या चित्रपटामध्ये नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘जो’ : या चित्रपटात रिओ राज, मालविका मनोज आणि भव्य त्रिखा हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट १५ जानेवारीला रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
‘हॅझबिन हॉटेल’ : ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे, जी लुसिफरच्या मुलीभोवती फिरते. ही सीरिज १९ जानेवारीला रोजी ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे.