‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री चा पती संकटात; सेलिब्रिटीही करतायेत प्रार्थना
!['Maine Pyaar Kiya' fame Bhagyashree's husband in crisis; Even celebrities pray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/534302-hrgiueg.webp)
भिनेता सलमान खान स्टारर ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री सध्या तिच्या एका खासगी कारणामुळे चर्चेत आहे. ‘मैने प्यार किया’ सिनेमातून एका रात्रीत फेम मिळवण्यानंतर आणि करियर योग्य दिशेला असताना अभिनेत्रीने हिमालय दसानी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर होती. पण आता पुन्हा अभिनेत्री मोठ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे.
भाग्यश्रीचा पती कार अपघातात जखमी
नुकताच अभिनेत्रीचा पती हिमालय दसानीचा अपघात झाला होता. कार अपघातामुळे भाग्यश्रीच्या पतीची शस्त्रक्रिया साडेचार तास चालली. या संकटाच्या काळात भाग्यश्रीने तिच्या पतीचा रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करून, पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय अभिनेत्रीचा व्हिडीओ
पतीचा रुग्णालयातील फोटो शेअर करत भाग्यश्रीने कॅप्शनच्या माध्यामातून भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हिमालयाच्या उजव्या खांद्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली जी साडेचार तास चालली. वेदना तर होतच आहेत, पण अश्रूंवर नियंत्रण ठेवावं लागतं.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं फार गरजेचं असतं. आम्हाला सांगितलं होतं एका दिवसात सगळं काही ठिक होईल. यावर आमचा विश्वास नव्हता. डॉ. गौतम तिवारी आणि त्यांच्या टीमचे आभार.. त्यांनी माझ्या पतीची उत्तम काळजी घेतली.’
सध्या भाग्यश्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भाग्यश्रीचा पती हॉस्पिटलमध्ये बेडवर दिसत आहे. शस्त्रक्रिया करून परत आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. यासोबतच भाग्यश्रीही पतीला आनंदी पाहून खूप आनंदी दिसत आहे.