#Lockdown: ‘Bigg boss’ विजेत्याने गच्चीवर साधेपणाने केलं लग्न; करणार कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/WhatsApp-Image-2020-04-29-at-8.02.43-AM.jpeg)
देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे अनेकांनी लॉकडाउनपूर्वीच नियोजित केलेले कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. यामध्ये अनेकांना त्यांच्या लग्नाची तारीखही पुढे ढकलावी लागली आहे. परंतु ‘बिग बॉस २’चा विजेता आशुतोष कौशिकने या लॉकडाउनच्या काळात लग्न केल्याचं समोर आलं आहे.वृत्तानुसार, ‘बिग बॉस २’ आणि ‘एमटीव्ही रोडीज ५’चा विजेता आशुतोष कौशिक याने लॉकडाउनच्या काळात लग्न केलं आहे.
मात्र त्याने सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन धुमधडाक्यात लग्न न करता साध्या पद्धतीने केलं. सहारनपुरमधील त्याच्या घराच्या गच्चीवर ४ लोकांच्या उपस्थितीत त्याने लग्न केलं आहे. विशेष म्हणजे लग्नातील खर्चासाठी ठेवलेले पैसे आता तो पंतप्रधान मदतनिधीमध्ये जमा करणार आहे.
https://www.instagram.com/p/B_gv15GFXnb/?utm_source=ig_embed&ig_mid=40166074-DC49-4339-BCD0-075B9AB58087
आशुतोषने अलीगढमधील अर्पिता या मुलीशी लग्न केलं असून २६ एप्रिल त्यांच्या लग्नाची तारीख ठरविण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे घरातल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून आशुतोषने साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २६ तारखेलाच घराच्या गच्चीवर लग्न केलं. या वेळी केवळ ४ जण उपस्थित होते.
दरम्यान, आशुतोषने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या लग्नाची माहिती मित्र-परिवाराला दिली आहे. आशुतोष छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार असून ‘बिग बॉस 2’ आणि ‘रोडिज 5 ‘मुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली. त्याने ‘लाल रंग’, ‘जिला गाजियाबाद’, ‘भडास’, ‘शॉर्टकट रोमियो’ अशा चित्रपटांमध्येही काम केलं आहे.