breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

IMDb कडून टॉप १० भारतीय कलाकारांची यादी जाहीर; कोण आहे सर्वात लोकप्रिय?

IMDb Top 10 Actors In India : IMDb म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेसकडून दरवर्षी टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली जाते. IMDb ने या वर्षातील लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली आहे. टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादीत बॉलिवूडच्या ‘बादशाह’ शाहरूखने बाजी मारली आहे. या यादीत तीन अभिनेते आणि सात अभिनेत्रींचा समावेश आहे.

शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमुळे या यादित अव्वल स्थानी आहे. तर दुसरा क्रमांक आलिया भट्टने पटकावला आहे. या वर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि हॉलिवूडचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हे दोन सिनेमे रिलिज झाले होते.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिसरे स्थान मिळवले आहे. तर या यादीत अभिनेत्री वामिका गब्बी चौथ्या क्रमांकावर आणि अभिनेत्री नयनताराने पाचव्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री तमन्ना भाटियाने सहावे स्थान पटकावले आहे. तर करीना कपूर खान सातव्या आणि शोभिता धुलिपाला आठव्या स्थानावर आहे. या यादित बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा ९ व्या नंबरवर आहे. तर शेवटी साउथस्टार विजय सेतुपती आहे.

हेही वाचा  –  ‘माझे वडील महिन्याभरात पुन्हा हसतील’; रोहित शर्माच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल 

IMDb ची २०२३ ची टॉप १० सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी :

  1. शाहरुख खान
  2. आलिया भट्ट
  3. दीपिका पादुकोण
  4. वामिका गब्बी
  5. नयनतारा
  6. तमन्ना भाटिया
  7. करीना कपूर खान
  8. शोभिता धुलिपाला
  9. अक्षय कुमार
  10. विजय सेतुपती
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button