KGF2 मधील संजय दत्तचा फर्स्ट लुक प्रसिद्ध

केजीएफ-2 चित्रपटातील अभिनेता संजय दत्त याने महत्वाची भूमिका साकारली असून, चित्रपटातील त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लुक निर्मात्यांनी प्रसिद्ध केला आहे. संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. निर्मात्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं की त्याच्या वाढदिवशी चित्रपटातील त्याचा लुक प्रसिद्ध केला जाईल.
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेन्मेंटसह निर्मात्यांनी यापूर्वी जाहीर केले होते की ते 29 जुलै, 2020 रोजी ‘अधिरा’ चे अनावरण करतील. त्यांच्या सोशल मीडियावरुन एक्सेल एंटरटेनमेंट आणि निर्माता रितेश सिधवानी यांनी अधीराचा लूक शेअर करताना लिहिले की,
केजीएफ चॅप्टर 1 ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, ज्याने केवळ भारतातच नव्हे तर सर्वत्र कोट्यवधी लोकांची मने जिंकली होती. निर्मात्यांनी वर्षभरापूर्वी केजीएफ चॅप्टर २ चे पहिले पोस्टर लाँच केले होते तेव्हा या रहस्यमयी अधीराची तोंडओळख करुन दिली होती.
पहिला चॅप्टरमध्ये यशच्या रॉकीने त्याच्या प्रतिस्पर्धी गरुडचा वध केला, ज्याने गुलामगिरी आणि क्रूरपणाने कोलारच्या सोन्याच्या खाणींवर नियंत्रण ठेवले होते. घटना घडल्यानंतर, अधीराने असे वचन दिले होते की गरुडा जिवंत आहे तोपर्यंत सोन्याच्या खाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. केजीएफच्या दुसर्या भागात आपल्याला अधीरा आणि रॉकी यांना सोन्याच्या खाणींवर जोरदार संघर्ष करत असताना दिसतील.
केजीएफ चॅप्टर 2, एका बाजूला प्रचंड मोठ्या अवकाशात तयार होणारा असा बहुप्रतीक्षित चित्रपट नेत्रसुखद आणि आश्चर्यजनक अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे तर दुसऱ्या बाजूला यामध्ये सुपर रॉकिंग सुपरस्टार यश, संजय दत्त, रवीना टंडन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या शानदार भूमिका असणार आहेत.





