कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांनाआईचा मृतदेह पाहताच अश्रू अनावर
आई सरोजा संजीव यांचे रविवारी बेंगळुरू येथे निधन , वाहिली श्रद्धांजली
बेंगळुरू : कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांच्या आई सरोजा संजीव यांचे रविवारी बेंगळुरू येथे निधन झालं. आईच्या निधनांमुळे सुदीप आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनानंतर सुदीप हे आईला श्रद्धांजली देताना दिसले. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आईचा मृतदेह पाहिल्यानंतर सुदीप ढसाढसा रडू लागले. त्यांच्या फोटोवर नेटकरी आणि चाहते देखील कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत.
सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये सुदीप राजकारणी बसवराज बोम्मई यांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईच्या निधनानंतर सुदीप पूर्णपणे कोलमडले आहेत.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुदीप यांच्यासोबतचे भावनिक क्षण शेअर केलेत. राजनेते सुदीप आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली आणि सरोजा संजीव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. फोटोंमध्ये किच्चा सुदीप त्यांनी मिठी मारून भावूक झालेले दिसत आहेत.
सुदीप यांच्या आईच्या निधनानंतर बसवराज बोम्मई यांनी अभिनेत्याचा आईसोबत एक फोटो पोस्ट करत निधनाची माहिती दिली. बसवराज बोम्मई फोटो पोस्ट करत म्हणाले, किच्ची सुदीप यांच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे शोक व्यक्त करत आहेत. या कठीण काळाचा सामना करण्यासाठी देव सुदीप आणि त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो अशी प्रार्थना. सध्या त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
सुदीप यांच्या आईबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 86 व्या वर्षी सुदीप यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आई सरोजा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुदीप यांच्या आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.