आजच्या सुनावणीलाही कंगना गैरहजर, कोर्टाकडून दंडात्मक कारवाई
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई – अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगना रनौतविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टानं कंगनाला समन्स जारी करत 1 मार्चच्या सुनावणीत हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. मात्र कंगना या सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टानं कंगनाविरोधात ही दंडात्मक कारवाई केली आहे.
कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी सोमावरी कोर्टाला सांगितलं की, कंगना ही सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे, तसेच काही वैयक्तिक कारणास्तव ती या सुनावणीस हजर राहू शकली नाही. त्यामुळे कंगनापुढे यासंदर्भात आता अंधेरी दंडादिकारी कोर्टात हजर राहून रितसर जमीन घेणं किंवा या वॉरंटच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणं हे दोन कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. कोर्टानं याप्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्चला होणार आहे. दरम्यान याप्रकरणी लवकरच हायकोर्टात दाद मागणार असल्याचं कंगानाच्या वकिलांनी सांगितलं.