ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जिनिलियाचे रितेशच्या 46 वा वाढदिवसाला अत्यंत खास पोस्ट लिहून प्रेम व्यक्त

जगभरातील त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांच्याकडे पाहून ‘प्रेम असावं तर असं’ अशी भावना मनात निर्माण होते. देवाने जणू या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय, असं त्यांच्याकडे पाहून वाटतं. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा. नुकताच रितेशने त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त जगभरातील त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्नी जिनिलियानेही रितेशसाठी अत्यंत खास पोस्ट लिहून प्रेम व्यक्त केलं होतं. रितेश आणि जिनिलियाने जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जिनिलिया आणि रितेशची जोडी ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघं पती-पत्नी असले तरी त्यांच्या नात्याचं मूळ हे मैत्री असल्याचं ते नेहमीच सांगतात. गेल्या 12 वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत सुखाचा संसार करत असले तरी लग्नाआधीच्या दहा वर्षांत त्यांनी बऱ्याच चढउतारांचा सामना केला होता.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना रितेश एका मुलाखतीत म्हणाला होता की तो जिनिलियाला सर्वांत पहिल्यांदा हैदराबाद एअरपोर्टवर भेटला होता. त्यावेळी दोघं त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जात होते. या भेटीदरम्यान जिनिलियाला रितेश आवडला होता. पण त्याच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहता तो अहंकारी किंवा उद्धट असेल असं तिला वाटलं होतं. पण जेव्हा रितेशसोबत तिची मैत्री झाली, तेव्हा त्याचा खरा स्वभाव तिने ओळखला आणि त्याच्या प्रेमात पडली.

सुरुवातीला रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाला विलासराव देशमुख यांचा नकार होता, असं म्हटलं जातं. मात्र नंतर त्यांनी होकार दिला आणि अखेर फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर नोव्हेंबर 2014 मध्ये जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर जून 2016 मध्ये तिने राहीलला जन्म दिला. रितेशसोबत लग्न आणि आई झाल्यानंतर जिनिलियाने अभिनयक्षेत्रातून काही काळा ब्रेक घेतला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button