प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
![Famous actress Mandira Bedi's husband dies of heart attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Mandira-Bedi.jpg)
मुंबई – अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं.
तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं आहे. अभिनेता रोहित रॉय याने राज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
रोहितने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आतापर्यंत भेटलेली सुंदर व्यक्ती. तुम्ही लकी असाल तरच तुम्ही त्याला मित्र म्हणू शकाल. गुड बाय न म्हणतात तो निघून गेलाय. व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या मित्रा, माझ्या भावा, खूप वाईट झालं. पुढच्या आठवड्यात भेटू असं म्हणत गेलो आणि आता तो पुढचा आठवडा कधीच येणार नाही, असं रोहितने म्हटलंय.