ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी

हेमा मालिनी आणि मुली इशा देओल धर्मेंद्र यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील “ही-मॅन” असणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा प्रकृती बिघडल्याने सगळेच चिंतेत होते. चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत होते. धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची एक टीम सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून होती आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबतच होते.मात्र आता त्यांची तब्येतीत सुधारणा असून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. या बातमीने सर्वांनाच दिलासा मिळाला. धर्मेंद्र पूर्णपणे स्वस्थ होऊन घरी परतले आहेत. त्यांच्या परतण्याची बातमी सार्वजनिक होताच, चाहते आणि जवळच्या मित्रांनी आनंद व्यक्त केला.

8 डिसेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस

दरम्यान धर्मेंद्र यांचा वाढदिवसही जवळ आला आहे. ही-मॅन 8 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आता धर्मेंद्र यांची तब्येत सुधारली आहे. ते हळूहळू रिकव्हर होत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी त्यांच्या कुटुंबाने सुरु केली आहे. यावेळी, संपूर्ण कुटुंब 8 डिसेंबर रोजी एकत्रितपणे एका भव्य समारंभाचे नियोजन करत आहे.

हेही वाचा –  स्वच्छ सुंदर सातारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार जिल्हा परिषदेतर्फे अभिनव उपक्रम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची संकल्पना

कसं असणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन?

हेमा मालिनी यांनी एका खास कौटुंबिक मेळाव्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर येत आह. ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहतील. दरम्यान, ईशा देओलनेही तिचे वडील बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

देओल कुटुंब त्यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी

धर्मेंद्र घरी परतल्याने देओल कुटुंबातील वातावरण पुन्हा एकदा सकारात्मक आणि आनंदी झाले आहे. सनी देओल आणि बॉबी देओल हे सतत रुग्णालयात वडिलांसोबतच होते. पण आता धर्मेंद्र यांना स्वस्थ पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केलं आहे. त्यांच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा पाहता येत्या काही दिवसात ते पूर्वीसारखेच सक्रिय होतील अशी सर्वांनाच आशा आहे.

त्यानमुळे आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, देओल कुटुंब त्यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत. तसेच धर्मेंद्र यांचे चाहते देखील त्यांचा 90 व्या वाढदिवसाची , सेलिब्रेशनची आणि मुख्यत: धर्मेंद्र यांना पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button