breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

दीपिका-रणवीरच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Deepika Padukone And Ranveer Singh | अभिनेत्री दीपिका पादुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. दीपिका व रणवीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता दीपिकाने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

दीपिकाने हिने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका-रणवीर यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा     –      शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची 

रणवीर आणि दीपिकाची ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून लव्हस्टोरी सुरू झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघे ‘बाजीराव- मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेंकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आजोजन करण्यात आले होते. २०१५ मध्ये रणवीर आणि दीपिकाने गुपूचप साखरपुडाही केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button