ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

दीपिकाने मातृत्वाचा येणारा अनुभव सांगितला व्हिडीओच्या माध्यमातून

नवजात बालकाला दूध पाजताना आईला येणाऱ्या अडचणी,व्हिडीओ पोस्ट करत विचारला प्रश्न?

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने 8 सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास 6 वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी लेकीचं जगात स्वागत केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर दीपिका मोठ्या पडद्यापासून दूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतरचा आनंद आणि अनुभव अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत आहे. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लेकीचा सांभाळ करताना आणि तिची काळजी घेतना येणाऱ्या अडचणी अभिनेत्रीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सर्वत्र दीपिकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

दीपिका हिने इन्स्टाग्रामवर एका महिलाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सांगायचं झालं तर, नवजात बालकाला दूध पाजताना आईला येणाऱ्या अडचणी दीपिका हिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा बालकाला भूक लागते तेव्हा बाळ डोळं उघडतं आणि आई जेव्हा दूध पाजायला सुरुवात करते तेव्हा बाळाचं लगेच पोट भरतं आणि बाळ लगेच झोपून जातं. प्रत्येक आईला येणारा असा अनुभव सध्या दीपिका देखील अनुभवत आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्रीने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

दीपिका हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला झोपेत असते आणि तिला अचानक भूक लागते. त्यामुळे ती पळत किचनमध्ये जाते आणि पदार्थ घेऊन टेबलवर बसते. एक घास खाल्ल्यानंतर महिला लगेच झोपते. असंच काही नवजात बालकांसोबत देखील होतं. व्हिडीओ शेअर करत दीपिका हिने सर्वांना एक प्रश्न देखील विचारला आहे. ‘मोठी माणसं देखील असं करू लागली तर?’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

दीपिकाने बदललं इन्स्टाग्राम बायो
लेकीला जन्म दिल्यानंतर दीपिका हिने स्वतःचं इन्स्टाग्राम बायो देखील बदललं. फीड.बर्प.स्लीप.रिपीट… असं अभिनेत्रीने लिहिलं आहे. हे एका लहान बाळाचं दिनक्रम आहे आणि प्रत्येक आई स्वतःया दिनक्रमाचा भाग करते. दीपिका आणि रणबीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्याची माहिती दिल्या नंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दीपिका पादुकोण हिचे आगामी सिनेमे
दीपिका पादुकोण हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अजय देवगन, करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button