breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus: माशांमुळेही वाढू शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव,अमिताभ बच्चन यांची माहिती

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद सरकार प्रयत्न करतायत..मात्र कोरोना विषाणूबाबतची रोज एक नविन माहिती ,नवा शोध समोर येत आहे..त्याचप्रमाणे आता आणखी एक नविन माहिती समोर आली आहे…या माहितीनुसार माशांमुळेही करोना होण्याची शक्यता वाढत असल्याचं म्हटलं जात आहे…. वैद्यकीय क्षेत्रातील जगविख्यात साप्ताहि‌क द लॅन्सेटच्या संधोधनातून ही माहिती समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने माशीच्या माध्यमातून करोनाची लागण होऊ शकते यासंबंधी माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, करोनामधून बरा झालेल्या व्यक्तीच्या विष्टेत करोनाचे विषाणू जिवंत असतात. हे विषाणू मानवी विष्टेवर आठवडाभर जिवंत राहू शकतात. या विष्टेवर बसलेली माशी फळं, भाज्यांवर बसल्याने करोना आजार परसण्याची भीती आहे…

पाहुयात अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओत काय माहिती दिली आहे …

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button