‘ब्रह्मास्त्र २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली माहिती
![Brahmastra 2 will soon hit the screens](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Brahmastra-2-780x470.jpg)
देवच्या भूमिकेत कोण असेल हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाही
Brahmastra 2 : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर आता प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, ब्रह्मास्त्र सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं की, ‘ब्रह्मास्त्र २’ या सिनेमाचे काम सुरू आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रेक्षणीय असेल. ब्रह्मास्त्र या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करायला आम्ही १० वर्षे लावली तर आमचा सिनेमा पाहायला प्रेक्षक येणार नाहीत. येत्या दोन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं तो म्हणाला.
‘ब्रह्मास्त्र २’ या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण असणार याबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. रणवीर सिंहपासून यशपर्यंत अनेक नावांची चर्चा आहे. त्यामुळे आता देवच्या भूमिकेत कोण दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पण देवच्या भूमिकेत कोण असेल हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाही. प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. या सिनेमाचा दुसरा भाग खूपच रंजक असणार आहे, असंही अर्यान मुखर्जी म्हणाले.