Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

दोघांनी उगवता सूर्य चिन्ह मागितलं पण निवडणूक आयोगाचा नकार, मोठं कारण समोर!

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

शिंदे गट आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने सादर केलेल्या पर्यायांमध्ये उगवता सूर्य हे चिन्हही देण्यात आलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना हे चिन्ह देण्यास नकार दिला आहे. पण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला हे चिन्ह अमान्य का केलं. तर त्यामागे एक मोठं कारण आहे.

ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हावर माजी महापौरांनी गाणं गात दिली प्रतिक्रिया
मुंबई: शिवसेना नाव आणि शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला नवं नाव दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. तर, ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. शिंदे गटाला चिन्हांसाठी पर्याय सादर करण्यास सांगितलं आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने सादर केलेल्या पर्यायांमध्ये उगवता सूर्य हे चिन्हही देण्यात आलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना हे चिन्ह देण्यास नकार दिला आहे. पण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला हे चिन्ह अमान्य का केलं. तर त्यामागे एक मोठं कारण आहे.

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मशाल, त्रिशुळ आणि उगवता सूर्य हे चिन्हांचे पर्याय मांडले होतं. तर, शिंदे गटाकडून ठाकरेंप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली. तर तिसरा पर्याय म्हणून गदा हे चिन्ह दिलं. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांच्या पर्यायातून उगवता सूर्य हे चिन्हंच वगळलं. त्यामुळे दोन्ही गटांना उगवता सूर्य हे चिन्ह मिळालेलं नाही.

द्रमूक कनेक्शन

शिंदे आणि ठाकरे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह न देण्यामागे एक मोठं कारण समोर आलं आहे. देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला एक निवडणूक चिन्ह देण्यात येतं. ते चिन्ह पुन्हा कुठल्या पक्षाला देता येत नाही. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रमूक या राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह हे डोंगरांमागून उगवणारा सूर्य आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना उतवता सूर्य हे निवडणूक चिन्ह नाकारलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button