अभिनेत्री भाग्यश्रीच्या लेकीलाही बॉलिवूडचे वेध
![Bollywood is also watching actress Bhagyashree's Leki](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Prabhatkhabar_2021-02_efa577bf-a1af-42cd-829b-702b38b69ece_av6.jpg)
भाग्यश्रीच्या लेकीलाही बॉलिवूडचे वेध
1989 मध्ये रिलीज झालेला ‘मैंने प्यार किया’ हा सिनेमा सुपरहीट ठरला. सिनेमात बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानसह भाग्यश्रीने क्रिन शेयर केली होती. ती रातो रात स्टार झाली. हा सिनेमा इतका गाजला की भाग्यश्रीला सिनेसृष्टीत पदार्पण करताच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. मात्र भाग्यश्रीला या सिनेमानंतर मोठय़ा पडद्यावर आपली जादू कायम ठेवण्यात अपयश आले. काही दीवसात तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लग्न झाल्यानतंर भाग्यश्रीने तिच्या करीयरला ब्रेक देत एक मुलगी अवंतिका आणि मुलगा अभिमन्यूला जन्म दिला. अभिमन्यू यापूर्वी अनेक सिनेमात झळकला आहे. त्याने ‘मर्द को दर्द नही होता’ या सिनेमामधून डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूरता आपटला. आता अभिमन्यू नंतर भाग्यश्रीची मुलगी अवंतिका फिल्मी दुनियेत पदार्पण करण्यास सज्ज होत असून नशीब आजमावणार आहे.अवंतिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच पोस्ट करत असते. दरम्यान, अवंतिका ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेंत्रीच्या तुलनेत अत्यंत सुंदर आहे. अवंतिकाने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतरच सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. अवंतिकाचं शिक्षण लंडनमध्ये झालं असून तिने बिजनेस आणि मार्केटिंगमध्ये पदवी
घेतली आहे. सध्या अवंतिकाचे नाव म्युझिक डारेक्टर अनु मलिकचा भाचा अरमानसोबत जोडले जातं आहे. तसेच ती तेलगू इंडस्ट्रीमध्ये दाखल होणार आहे. एका मुलाखती भाग्यश्रीने अवंतिकाच्या आगामी वेब शो बद्दल देखील चर्चा केली होती..