आर्यन खान आणि अनन्या पांडेचा लिपलॉक फोटो समोर; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य
![Aryan Khan and Ananya Pandey's liplock photo in front; Know the truth behind the viral photo](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/534992-celebrity-cpl-sssss-780x470.webp)
मुंबई : सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो व्हायरल होतात. आणि या सेलिब्रिटींना ओळखण्याचं चॅलेंजही दिलं जात. मात्र यावेळी समोर आलेला फोटो थोडा वेगळा आहे. या फोटोत एक सेलिब्रिटी कपल दिसत आहे आणि व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसणाऱ्या या कपलला ओळखण्यातं चॅलेंजही दिलं जात आहे.
या फोटोत एक अभिनेत्री एका अभिनेत्यासोबत लिपलॉक करताना दिसत आहे. मात्र अभिनेत्रीने अगदी हुशारीने स्वत:च्या फोनने चेहरा लपवला आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर अनेकजण हा फोटो अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान असल्याचं म्हणत आहेत.
अनेक युजर्सने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत लिहीलं आहे की, हा फोटो अनन्या आणि आर्यन खानचा आहे. तर बरेच जण हा फोटो अनन्या आणि आदित्य रॉय कपूरचा असल्याचंही म्हणत आहेत. एवढंच नव्हेतर अनेक जण हा फोटो अनन्या आणि ईशान खट्टरचा असल्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत म्हणत आहेत. तर काहीजण हा फोटो मिरा राजपूत आणि शाहिद कपूरचा असल्याचं म्हणत आहेत. मात्र नेमकं या फोटोत कोणतं सेलिब्रिटी कपल आहे हे ओळखणं कठिणचं आहे.
मात्र समोर आलेल्या या फोटोनंतर आर्यन आणि अनन्याच या फोटोत आहेत असं युजर्सचं म्हणणं आहे. सगळ्यांना माहित आहे की, स्टारकिड्स सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे हे बेस्ट फ्रेंड आहेत. तिघीही बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला आहे. अनन्या पांडेचा तिची मैत्रिण सुहाना खानचा भाऊ आर्यन खानसोबत चांगले संबंध आहेत. पण अनन्या पांडेचं तिच्या मैत्रिणीचा भाऊ आर्यनवर क्रश होतं असं तिने एकदा एका मुलाखतीत बोलूनही दाखवलं होतं.
https://www.instagram.com/pinkvilla/?utm_source=ig_embed&ig_rid=30542c58-9c86-4c29-8116-56b9859adab8
अनन्या पांडेचा मोठा खुलासा
कॉफी विथ करण या शोमध्ये सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्या मैत्रीविषयी बोलल्यानंतर करण जोहरने अनन्याला विचारलं, तुमच्यापैकी कोणाचंही सुहाना खानचा भाऊ आर्यन क्रश नव्हता का? यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, ”तो क्यूट आहे तो माझं क्रश होता. यानंतर करण जोहरने विचारलं, पण मग क्रश झाल्यानंतरही तुमची लव्हस्टोरी का पुढे गेली नाही? अनन्या लगेच म्हणाली, ते तुम्ही आर्यनलाच विचारा.