‘ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जातात’; ए आर रहमान यांची जुनी मुलाखत चर्चेत
आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत
![AR Rahman said that wrong films are sent for Oscars](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/a-r-rahman-780x470.jpg)
भारताला यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन अवॉर्ड मिळाले. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट शॉर्ट फिल्मचा तर आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगसाठी पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच संगीतकार ए आर रहमान यांची जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
कधीकधी मी पाहतो की आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. असं अजिबात करू नये असं मला वाटतं. आपण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. इथे काय चाललं आहे. हे पाहण्यासाठी मला पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्या जागी राहून आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे, असं ए आर रहमान यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. ही मुलाखत जानेवारी महिन्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.