Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले’; पंतप्रधान मोदींची ‘आप’वर टीका

Narendra Modi | दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, दिल्लीत विविध विकासाकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की मी सुद्धा शीशमहल (काचेचा बंगला) बांधू शकलो असतो, पण मोदींने स्वत:साठी कधीही घर बांधले नाही हे देशाला चांगल्या प्रकारे माहित आहे. मी गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत.गेल्या १० वर्षात दिल्लीला आपत्तीने वेढले आहे. अण्णा हजारे यांना पुढे करत काही अत्यंत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले आहे. आप आपदा बनकर दिल्ली पर टूट पडी है.

हेही वाचा    –      To The Point : खासदार अमोल कोल्हे यांची भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाकडे पाठ!

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग ७ किंवा ८ जानेवारीला दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. दिल्लीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असून १५ फेब्रुवारीनंतर निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button