नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ‘यु.एम.बी.मिस इंडिया २०२४’ !
दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर दि. १० नोव्हेंबर रोजी स्पर्धा उत्साहात
![Ankita Dahiya of Navi Mumbai became 'UMB Miss India 2024'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ankita-Dohiya-780x470.jpg)
नवी दिल्ली : येथे पार पडलेल्या यु. एम. बी. ‘मिस इंडिया २०२४’ या स्पर्धेत मुंबईची कु. अंकिता दहिया ही अजिंक्य ठरली. अंकिता ही निवृत्त मरीन कमांडो दारासिंग दहिया यांची मुलगी आहे.
ही स्पर्धा दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर दि. १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ६५ स्पर्धक सहभागी झाले होते आणि ज्युरी म्हणजे परीक्षकांचे काम माजी मिस वर्ल्ड मनुश्री चिल्लर, सिने अभिनेता अर्जुन कपूर आणि सिने अभिनेत्री सारा खान यांनी केले.
अंकिता दहिया हिने सुरुवातीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार पाडत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिला विचारण्यात आले की, तू मिस इंडिया झालीस, तर भारताची कोणती सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्ट जगामध्ये पोहोचवशील ? तिने स्पष्ट केले की मी शारीरिक तंदरुस्तीला अत्यंत महत्व देणाऱ्या एका कुटुंबाची सदस्य असून आपली पारंपारिक योगविद्या सर्व जगामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करेन. भारताचा सांस्कृतिक वसा आणि वारसा असलेली पुरातन मंदिरे जागतिक स्तरावर पोहोचावीत यासाठी मनापासून प्रयत्न करेन. अंकिता हिचे या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि स्वागत होत आहे.