अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशीच कोट्यवधींची कमाई
![Allu Arjun-Rashmika's 'Pushpa' hits box office; Billions earned on the first day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/maxresdefault.jpg)
बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. दाक्षिणात्य चित्रपटातील अॅक्शन सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
‘पुष्पा: द राइज चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली. फक्त तमिळनाडूमध्येच या चित्रपटाने 4.06 कोटी कमावले. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ओपनिंग डेला तेलंगणामध्ये 11 कोटींची कमाई केली. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘पुष्पा: द राइज’ हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक रेड सँडलवुड स्मगलर्सच्या जीवनावर आधारित आहे.अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.