आलिया भट्ट एक वकील ,रणबीर कपूरने केला खुलासा
मी एक असा व्यक्ती आहे, ज्याला अजिबातच अहंकार नाहीये, मी नेहमीच माफी मागतो.
![Alia Bhatt, Lawyer, Ranbir Kapoor, Disclosure, Person, Ego, Always, Sorry,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/aaliya-ani-ranvir-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आलिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. रणबीर कपूर याने पत्नी आलिया भट्ट हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा एका मुलाखतीमध्ये केला. आता त्याचीच जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.रणबीर म्हणाला की, मुळात म्हणजे मी रात्रभर झोपणारा माणूस आहे. ज्यावेळी आलिया आणि माझ्यात वाद होतात. त्यावेळी मी तिला सरळ म्हणतो की, चल आता झोप आणि सकाळी उठव मला.
आलियाबद्दल खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला की, आलिया एक वकील आहे. जर तिला वाटत असेल की तिची चूक नाही, तर ती गोष्ट स्पष्ट करेपर्यंत थांबत नाही.मुळात म्हणजे मी एक असा व्यक्ती आहे, ज्याला अजिबातच अहंकार नाहीये. कारण मी चूक असो किंवा नसो मी नेहमीच माफी मागतो. आलियासोबतच्या भांडणामध्येही मी हेच करतो.