बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या प्रकृतीबाबत वाईट बातमी
अक्षय कुमारला कोरोनाची लागण, स्वत:ला पूर्णपणे आयसोलेट!
![Akshay Kumar, Corona, Lagan,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/akshay-kumar-1-780x470.jpg)
मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार, सुपरस्टार अक्षय कुमारचा याचा ‘सरफिरे’ हा चित्रट सध्या खूप चर्चेत असून तो आज ( 12 जुलै) प्रदर्शित होत आहे. अक्षयने या चित्रपटासाठी भरपूर प्रमोशन केलंय, आता हे प्रमोशन अंतिम टप्प्यात आलंय पण दुर्दैवाने त्यामध्ये अक्षय कुमार सहभागी होऊ शकणार नाही. एवढंच नव्हे तर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा, अनंत याचा आज राधिक मर्चंटशी विवाह होत आहे, पण तेथे अक्षय उपस्थित राहू शकणार नाही. त्याचं कारण म्हणजे अक्षय कुमार याला कोरोना झाला आहे. त्यामुळेच त्याने स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी हा स्वत: अक्षय कुमारच्या घरी गेला होता आणि लग्नाची पत्रिका त्याला दिली होती. मात्र आता कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे अक्षय कुमार या लग्नापासून दूरच राहणार असल्याचं दिसतंय.
कसा झाला कोरोना?
जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या सरफिरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा त्याचा अंदाज खरा निघाला. त्यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता योग्य ती खबरदारी घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्यामुळे त्याने स्वत:ला पूर्णपणे आयसोलेट केले आहे.
देश-परदेशातील अनेक पाहुणे येणार
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह आज, अर्थात 12 जुलै रोजी होत आहे. लग्नापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचा सेलिब्रिटींनी आनंद लुटला आणि सर्व कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आले. आता लग्नाची वेळ आली आहे. या विवाहासाठी माइक टायसन, जॉन सीना, जस्टिन बीबर आणि किम कार्दशियन यांसारखे परदेशी कलाकारी आले आहेत. याशिवाय बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही या खास सोहळ्यात सहभागी होणार आहे. अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट देखील आज, 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगले व्ह्यूज मिळत आहेत पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.