breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

२१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा खिताब, हरनाझ संधू ठरली मानकरी

‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ सिंधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.

हरनाझच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे…इंडिया,” असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलंय. क्लिपमध्ये मेक्सिकोची मिस युनिव्हर्स २०२० आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाझला मुकुट घालताना दाखवली आहे.

कोण आहे हरनाझ संधू?

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button