अभिनेता अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत? नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा
![Actor Ajay Devgn as Chitragupta? The poster of the new movie is being discussed everywhere](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/ajay-devgan.jpeg)
बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. गेली अनेकवर्ष सातत्याने तो आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘सिंघम’ मधला कर्तव्यदक्ष अधिकारी असो, ‘तान्हाजीमधला’ मर्द मावळा किंवा ‘दृश्यम’ चित्रपटातील कुटुंबाला सांभाळणारा पिता असो, अजय देवगणने कायमच आपल्या अभिनयनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय देवगण सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. नुकतेच त्याचे ‘आर आर आर’ आणि ‘रनवे ३४’ चित्रपट प्रदर्शित झाले होते.
अजय देवगण यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे ती म्हणजे अजय देवगणच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग देखील रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय देवगण सिंहासनावर बसलेला दिसत आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अजय देवगण शोभून दिसत आहे. सुरु आहे. अजय देवगणनेही ट्विट करून चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची तारीख दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘या दिवाळीला चित्रगुप्त तुमच्या कुटुंबासोबत खेळ खेळायला येत आहे.
थँक गॉड हा विनोदी चित्रपट असणार आहे. इंद्र कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपासून अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासून याची प्रेक्षकवर्गात उत्सुकता होती. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. अखेर नुकतेच अजय आणि तब्बूने ‘भोला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
This Diwali, Chitragupt is coming to play the game of life with you and your family! #ThankGod trailer out tomorrow.
In cinemas on October 25.@SidMalhotra @Rakulpreet pic.twitter.com/78fjGfsUkq— Ajay Devgn (@ajaydevgn) September 8, 2022
अजय देवगणचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत असते. अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडच्या आदर्श आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता.