ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

मराठी माणसाच्या अस्तित्वावर भाष्य करणारा मराठी तितुका मिळवावा लघुपट प्रदर्शित

जय श्रीराम प्रॉडक्शन व वडगाव मावळचे तुषार वहिले यांचे कथा लेखन व दिग्दर्शन

वडगांव मावळः

वडगाव मावळ व चिंचवडमधील कलाकारांनी मिळून दिवाळीमध्ये मराठा तितुका मिळवावा या लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दिवाळीतील फटक्यांचा आवाज ऐकून सुभेदार तानाजी मालुसरे व मावळा यांना स्वराज्याची आठवण होते आणि शिवरायांच्या परवानगीने स्वराज्यात फेरफटका मारायला येतात, परंतु ज्या मावळ्यांनी मराठा म्हणजे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचे स्वराज्य उभे केले आज तेच त्यांना दिसेनासे झाले. त्यांना परप्रांतीय लोक भेटतात.

पुन्हा गडावर गेल्यावर छत्रपती शिवराय व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यातील संवाद हा विचार करायला लावतो. एकूणच मराठी राज्यात मराठी माणूस कुठे गेला, व्यापार, उद्योग, व्यवसाय यातून हद्दपार झाले की काय, अशी अवस्था आहे, याकडे लघुपटाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.

सर्व स्थानिक कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. जय श्रीराम प्रॉडक्शन व वडगाव मावळचे तुषार वसंतराव वहिले यांनी कथा लेखन व दिग्दर्शन केले आहे. व छत्रपती शिवराय साकारले तसेच देहू येथील निवृत्त सेना अधिकारी उदयसिंग परदेशी यांनी तानाजीराव व चिंचवड येथील महेश गावडे यांनी मावळा, विजया पाटील हिने माँसाहेब जिजाऊ साकारल्या आहेत. रश्मी साळुंके, रफिक मुलाणी यांनीही या लघुपटात भूमिका केल्या आहेत.

पहिल्याच प्रयोगाला छान प्रतिसाद
मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. यूट्यूबवर या चॅनलवर हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेकांनी या पहिल्याच प्रयोगाला छान प्रतिक्रिया दिल्या व शुभेच्छा दिल्या. भविष्यात मराठी चित्रपट साकारणार असल्याची माहिती तुषार वहिले व उदयसिंग परदेशी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button