breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! वाचा कोणाला मिळाला कुठला पुरस्कार..

National Film Awards Winners 2024 | ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांताराला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन हिला मिळाला असून चित्रपट कच्छ एक्सप्रेसला हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बर्जाद्या मिळाला असून चित्रपट उंचाईसाठी हा पुरस्कार मिळालाय.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ या सिनेमाला देण्यात आला आहे.’कार्तिकेय २’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पोनियिन सेल्वन १’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘KGF Chapter २’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘केजीएफ चॅप्टर २’ ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.

हेही वाचा    –      लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी १९९ कोटींचा खर्च! विरोधकांचा आक्षेप 

राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी

  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन आणि मानसी पोरख
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा
  • सर्वोत्कृष्ट फीचर फील्म होलसम एंटरटेनमेंट – कांतारा
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा, प्रमोद कुमार
  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – सौदी वेलाक्का
  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – PS1
  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – KGF2
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कार्तिकेय 2
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – Murmurs of the Jungle
  • दिग्दर्शक आणि प्रोड्युसर – साहिल वैद्य.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button