Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

१६ तासांचं इंटरमिटेंट फास्टिंग, व्यायाम अन्…; सोनाली कुलकर्णीने सांगितलं फिटनेसचं रहस्य, म्हणाली, “सकाळचं …..

Sonalee Kulkarni Fitness Routine : अलीकडच्या काळात बॉलीवुडसह अनेक मराठी सेलिब्रिटी फिटनेस फ्रीक असल्याचे पाहायला मिळते. कलाकारांकडून त्यांच्या चाहत्यांनासुद्धा स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. अनेक चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या फिटनेस आणि एकूण दिनचर्येबद्दल जाणून घेण्यात रस असतो. कलाकारसुद्धा विविध माध्यमांतून याबद्दलच्या काही टिप्स किंवा सूचना देत असतात.

अशातच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या फिटनेसबद्दल सांगितलं आहे. तसेच अभिनेत्रीची सकाळची सुरुवात कशी असते? ती कोणते पदार्थ खाते? याबद्दल तिने सांगितले. सोनाली कुलकर्णी गेली काही वर्षे इंटरमिटेंट फास्टिंगही करत आहे आणि याबद्दलही तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.

‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “माझं सकाळचं रुटीन हे त्या दिवसाच्या वेळापत्रकावर अवलंबून असतं. दिवसभर काही नसेल तर मी आरामात उठते. मला नैसर्गिकपणे जाग येते, तेव्हाच उठायला आवडतं. काही काम नसेल तर अगदी नऊ-दहा वाजता उठायलादेखील आवडतं. काम असेल तेव्हा पाच-सहा-सात अशा विचित्र वेळी उठावं लागतंच. तेव्हा काहीच करू शकत नाही. पण असं काही नसेल तर मला आरामात उठायला आवडतं.”टीन…”

हेही वाचा – राज्यात वार्षिक बाजारमूल्य दर ‘जैसे-थे’… बांधकाम क्षेत्रासह घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना दिलासा…

यापुढे ती म्हणाली “मला ध्यानधारणा वगैरे जमत नाही. पण मी एक इअर इंजिनिअरींगचा कोर्स केला होता. मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून ते केलं होतं. मी खूप आध्यात्मिक नाही किंवा खूप धार्मिकही नाही. पण मी Agnostic विचारांची असल्याने एखाद्या गोष्टीचा अनुभव आला की, माझा विश्वास बसतो. मग तो विश्वास आणखी घट्ट होत जातो. त्यातूनच मी इअर इंजिनिअरींग केलं होतं. त्याचा मला खुप फायदा झाला. सकाळी कॉफी घ्यायच्या आधी मी अर्धा तास वगैरे ते करते. मग पुढे ब्लॅक कॉफीने माझ्या दिवसाची सुरुवात होते.”

यानंतर सोनाली म्हणाली, “मी इंटरमिटेंट फास्टिंग करते. कमीतकमी १६ तास करते. पण कधीकधी प्रवास किंवा शूटिंगमुळे ते १८-१९ तास होतात. जे शक्यतो होऊ नये. पण मला या वेळात माझ्या शरीराला आराम द्यायला आवडतं. यादरम्यान जेवणातील प्रोटीन्सचा वगैरे मी जास्त विचार करत नाही. एखादा पदार्थ खाल्ला नाही तर मन दु:खी होतं. पण कशाला इतका त्रास का करून घ्यायचा? आपण फास्टिंग आणि व्यायाम करतच असतो, तर मग एखादा गोड पदार्थ खाल्ला आणि त्यामुळे मन तृप्त होत असेल तर स्वत:च्या शरीराला ते का देऊ नये. मी आठ तासांमध्ये शक्यतो काहीतरी पौष्टिक खाते. यात एखादी भाकरी वगैरेसुद्धा खाते. त्यानंतर मग फोन बघते. नंतर पुढे किमान तासभर व्यायाम करते.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button