breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

‘हा चित्रपटाचा सेट नव्हे’,खासदार मिमी चक्रवर्ती, नुसरत जहां झाल्या ट्रोल

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी संसदेच्या बाहेरचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्या फोटोवरून त्यांना सोशल मीडियावर भयंकर टीकेला सामोरे जावे लागत आहे.’संसद ही फोटो काढण्याची योग्य जागा नाही.’ असं त्यांना सांगण्यात येतंय.

बंगाली सुप्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां या पश्चिम बंगालमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या दोघीही तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत. संसदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी संसदेच्या बाहेर उभं राहून फोटो काढला आहे.या फोटोवरून त्यांची थट्टा उडवली जात आहे.संसदेच्या सभासद म्हणून त्यांनी योग्य वेशभूषा केलेली नाही असंही म्हटलं जात आहे.

बशिरहाट भागाच्या खासदार नुसरत जहां यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे.त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागतोय. एका नागरिकाने बंगाली भाषेत लिहिले आहे की,”ही फोटो काढण्याची जागा नाही. इथे तुम्ही नागरिकांच्या हक्कांसाठी लढले पाहिजे. इथून देश चालवला जातो. ही तुमची योग्य जागा नाही.” काहींनी नुसरत यांनी फोटोसोबत लिहिलेल्या ओळींमधील व्याकरणाच्या चुका काढल्या आहेत.

मिमी यांनी देखील संसदेबाहेरचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी जीन्स,पांढरा शर्ट घातला आहे. या फोटोवर अनेकांनी “ही चित्रपटाच्या शूटिंगची जागा नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका नागरिकाने असेही म्हटले आहे की,”तुम्ही अशी नाटकं करण्यासाठी संसदेत गेला आहेत का ? कृपया असं वागून बंगाल राज्याला लाजवू नका.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button