सैफ अली खानच्या ऑनस्क्रीन मुलीचा बोल्ड अंदाज…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-119.png)
बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिडसची सर्वात जास्त चर्चा आहे. यातच आणखीन एका स्टारकिडसची भर पडली आहे अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला हीची…लवकरच रूपेरी पडद्यावर सैफ अली खान आणि तब्बूचा आगामी सिनेमा ‘जवानी जानेमन’ रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये सैफ अली खान आणि तब्बू यांच्यात मजेदार केमेस्ट्री दिसत आहे. विशेष म्हणजे सिनेमात पूजा बेदीची मुलगी आलिया दिसणार आहे. या सिनेमात आलिया सैफच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/22-3.png)
रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच आलियाचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. सिनेमात झळकण्यापूर्वीच तिची लोकप्रियता पाहता अभिनय क्षेत्रातही ती इतर स्टारकीडसप्रमाणे आपला जम बसवेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/000-2.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/0000.png)
तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला तीन लाख ९२ हजारहून अधिक फॉलोअर्स असून सोशल मीडियावर तिचे अनेक फॅन पेजस आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयाआधीच तिने आपले सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे.