सुष्मिता सेनच्या मुलीने अस्खलित मराठी बोलत दिल्या मराठी दिनाच्या शुभेच्छा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-211.png)
कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. अनेक शाळांमध्ये मुलांना मराठी भाषेच महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम होत असतात. सर्वसामान्यच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्या मुलांना मराठीचे धडे शिकवताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या धाकट्या मुलीचा अलिशा सेनचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती मराठीत भाषण देताना दिसत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-64.png)
सुष्मिताने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, ‘लहान मुलांच्या तोंडून कोणतीही भाषा ऐकली तर ती गोडच वाटते.’ यासोबतच अलिशाला मराठी भाषेचे योग्य उच्चार शिकवण्यासाठी सुष्मिताने प्रितम शिखरे यांचेही यावेळी आभार मानले. या व्हिडिओमध्ये अलिशा ‘नमस्कार, शुभ सकाळ, उपस्थित माननीय प्राचार्य, माननीय प्रार्थमिक प्रमुख, शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.’ असं भाषण देताना दिसतेय…