breaking-newsमनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची सीबीआय पथकाकडून उलट तपासणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आज सीबीआयच्या पथकाने कूपर रुग्णालयात जाऊन पोस्टमॉर्टेम हाऊसमधील डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची तब्बल एक तास उलट तपासणी केली. कोरोना महामारीचा काळ असताना सुशांतच्या
मृतदेहाची कोरोना चाचणी का करण्यात आली नव्हती? हा सीबीआय अधिकाऱ्यांचा पहिला सवाल आहे. त्याचप्रमाणे एवढ्या घाईघाईने सुशांतचे पोस्टमार्टम का करण्यात आले? हा देखील सीबीआयचा प्रमुख प्रश्न आहे. मुंबई पोलिसांनी सांगितल्यामुळे आपण घाईघाईने सुशांतचे शवविच्छेदन केले, अशी कबुली कूपर रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी यापूर्वी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

आज सुशांतचे शवविच्छेदन आणि त्यातील त्रुटी आणि तफावती याची माहिती घेण्यासाठी सीबीआयचे पथक कूपर रुग्णालयातील पोस्टमार्टेम हाऊस मध्ये गेले होते. सुशांतचा कुक नीरज याने आपण सुशांतला 14 जून रोजी सकाळी नारळाचे पाणी व ज्युस दिल्याचे चौकशी सांगितले आहे. मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये सुशांतने नारळ पाणी किंवा ज्यूस प्याल्याचे ट्रेसेस मिळालेले नाहीत. या व अशा अनेक बाबींबाबत सीबीआय अधिकाऱ्यांना माहिती घ्यायची होती. एक तास कूपर रुग्णालयात थांबल्यानंतर हे पथक पुन्हा परत कालिना येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये परतले.

सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने आज पुन्हा सिद्धार्थ पिठानी आणि कुक नीरज यांची पुन्हा उलट तपासणी घेतली. आज सीबीआय अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्ती हिला सीबीआय समोर हजर होण्याचे समन्स पाठविले आहे. मात्र रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी असे समन्स मिळाल्याचा इन्कार केला. सीबीआयचे आणखीन एक पथक आज अंधेरी येथील “वॉटर स्टोन” रिसॉर्टमध्ये गेले होते. तिथेच रिया चक्रवर्ती ही सुशांतवर स्पिरिच्युअल गुरूंकडून उपचार करायची, असा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button