breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई यांचे निधन
पुणे – सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ ‘आशू’ यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती त्रिहान तसेच एक मुलगा आहे. आशू यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत. अत्रे यांच्याच ‘लग्नाची बेडी’ या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे.