breaking-newsमनोरंजन

सलमानच्या “भारत’मध्ये प्रियांकाच्या जागेवर कतरिना

सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाला अभिनेत्री प्रियंका चोप्राने रामराम ठोकल्यानंतर त्याच्या मदतीला त्याची लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ धावून आली आहे. प्रियांकाला दिली गेलेली ही भूमिका आता कतरिना साकारणार आहे. कतरिना येत्या सप्टेंबर महिन्यापासून ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे खुद्द सलमाननेच फेसबुक, ट्‌विटरच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे.

Salman Khan

@BeingSalmanKhan

Ek sundar aur shusheel ladki jiska Naam hai Katrina Kaif …. Swagat hai aapka ki zindagi mein …

मैने प्यार क्‍यों किया, पार्टनरपासून एक था टायगर आणि टायगर जिंदा है सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आतापर्यंत सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केले आहे. त्यांचे चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी कायमच आतुर असतात. त्यामुळे ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा ही संधी मिळणार आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफरने कतरिना आणि सलमानसोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सुक असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियंका चोप्राने लग्नासाठीच अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपट सोडल्याचे म्हटले जाते. प्रियंकाविषयी दिग्दर्शक अली आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना कुठलीही अढी नाही. मात्र रील लाईफ प्रॉडक्‍शन्सचे सीईओ निखिल नमित प्रियंकावर नाराज असल्याचे दिसत आहे. अचानक असा निर्णय घेण्याचे प्रियंकाचे वर्तन अत्यंत अनप्रोफेशनल असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button