सनी लियोन झळकली मेरिट लिस्टमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Sunny-Leones1.jpg)
बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनचे कोलकातातील एका टॉप कॉलेजमधून मेरिस्ट लिस्टमध्ये नाव आले आहे. बीए इंग्लिश ऑनर्स कोर्समध्ये प्रवेशासाठी कोलकातामधील आशुतोष कॉलेजच्या गुणवत्ता यादीमध्ये तिचे नाव आल्याने सनीने आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला आहे. ही यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या यादीचा स्क्रीनशॉट तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो सध्या खूपच व्हायरल झाला आहे.
आपली प्रतिक्रिया व्यक्त करत तिने ट्विट केले की, “तुम्हा सर्वांशी कॉलेजमध्ये पुढच्या सेमेस्टरमध्ये भेट होईल. आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्या वर्गात असाल.’ या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये सनी लिओनीचे नाव गुणवत्ता यादीत अव्वल स्थानावर दिसते. तसेच पश्चिम बंगालच्या बारावी बोर्ड परीक्षेत तिला 400 गुण मिळाल्यचा उल्लेख देखील आहे.
या गुणवत्ता यादी तिचा रोल नंबर 207777-6666 आणि अर्ज क्रमांक 9513008704 दर्शविण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी भवानीपूर पोलीस स्टेशन आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे. यामुळे सनी लियोन अडचणीत येण्याची शक्यता आहे.