श्रीदेवी यांना पुणेरी चाहत्यांकडून अनोखी आदरांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/car1-6.jpg)
चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि त्यांच्या मनात असणारं आपलं स्थान हीच कलाकारांची खरी संपत्ती असते असं म्हणायला हरकत नाही. चाहत्यांच्या प्रेमातच मोठ्या झालेल्या अशाच एका चेहऱ्याचं नाव आहे, श्रीदेवी. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चाहत्यांनी सुरुवातीपासूनच प्रेमाचा, आपुलकीचा वर्षाव केला. फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला.
श्रीदेवी यांच्या तीन चाहत्यांना चक्क चाँदनीच्या घरुन बोलावणं आलं होतं. सोशल मीडियावरही या चाहत्यांची चर्चा झाली. पुण्याच्या या तरुणी सध्याच्या घडीला ‘मिस हवाहवाई’च्या सुपरफॅन ठरत आहेत. परिधी भाटी (२६), भावना वर्मा (३३) आणि तोनू सोजातिया (२९) या तिघींनी होंडा सिटी या कारला असा काही हटके लूक दिला आहे, जो पाहून रस्त्याने जाणारा प्रत्येकजण या कारकडे वळून पाहत आहे. अवघ्या काही सेकंदांच्या दृष्टीक्षेपातच या कारच्या माध्यमातून बॉलिवूडच्या ‘चाँदनी’चा प्रवास डोळ्यांपुढे उभा राहतो.