Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
शेहनाज-सिद्धार्थच्या ‘शोना शोना’ला नेटकऱ्यांची तुफान पसंती
नवी दिल्ली – नेटकऱ्यांची लाडकी जोडी ‘सिदनाज’ अर्थात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाज गिल पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेलं त्यांचं ‘शोना शोना’ गाणं सोशल मीडियावर तुफान गाजतंय. टोनी कक्कर आणि नेहा कक्करने गायलेल्या या गाण्यात शेहनाज आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. काही तासांतच युट्यूबवर या गाण्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉसच्या १३व्या पर्वातून चाहत्यांच्या मनात घर केले. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. बिग बॉसनंतर दोघांचं ‘भुला दुंगा’ गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला युट्यूबवर असंख्य व्ह्यूज मिळाले होते. आता ‘शोना शोना’ गाणंही विक्रम करणार, असे म्हटले जात आहे.