शाहरूख खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/ShahRukh-Khan.jpg)
मुंबई | गेल्या महिन्यापासून बॉलिवूड जगतातून फक्त धक्कादायक बातमी समोर येत आहे. एप्रिलच्या अखेरीस दोन दिग्गज कलाकार सिनेसृष्टीला सोडून गेले. त्यापाठोपाठ आता शाहरूख खानच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगातून निरोप घेतला आहे. शाहरूख खानने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. शाहरूख खानचा अगदी जवळचा मित्र अभिजीत यांच निधन झालं आहे. SRK ची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील सर्वात महत्वाचे सदस्य आणि शाहरूखचे अगदी जवळचे मित्र अभिजीत यांच निधन झालं आहे. अभिजीत यांच्या जाण्याने शाहरूख खानला मोठा धक्का बसला आहे. अभिजीत यांना श्रद्धांजली वाहताना शाहरूखने भावूक पोस्ट लिहिली आहे.
शाहरूख खाननs, ‘तुमको न भूल पाएंगे’ म्हणत व्यक्त केल्या भावना. रेड चिलीजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अभिजीत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रेड चिलीजच्या पहिल्या टीममधील सदस्य अभिजीत यांच्या अचानक जाण्याने आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे.