लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले-2’ आज (30 ऑगस्ट) घेणार प्रेक्षकांचा निरोप; सुरू होणार ‘ही’ नवी मालिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/3Untitled_20design_20_281_29_8.jpg)
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले-2’ आज म्हणजे 30 ऑगस्ट पासून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज रात्री 10.30 या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेतील अण्णा म्हणजे माधव अभ्यंकर आणि शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर या पात्रांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. त्यातील इतर पात्र माई, छाया, सरिता, दत्ता, पांडू हे देखील लोकांच्या कायम स्मरणात राहतील अशीच आहे. काल 28 ऑगस्टला प्रसारित झालेल्या भागानुसार आज अण्णांचा मुलगा अभिरामचा साखरपुडा होणार आहे. मात्र या मालिकेचा शेवट गोड होतो की कडू हे पाहण्यासाठी सर्वांना आजचा एपिसोड बघावा लागेल. या शेवटचा एपिसोड पाहण्यासाठी सर्वजच प्रेक्षक उत्सुक आहेत.
या मालिकेत शेवंताच्या मृत्यूनंतर सुरु झालेला रात्रीचा खेळ, अण्णांनी ज्यांचे जीव घेतले त्या सर्वांची भूतं अण्णांना त्रास देऊ लागली होती. मात्र माईंनी अण्णांना यातून बाहेर काढले. मात्र म्हणतात या जन्माचे याच जन्मी भोगावे लागते. त्यामुळे अभिरामच्या साखरपुड्यात काहीतरी विघ्न येणार याची चाहूल माईंना लागली आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-98-1024x504.jpg)
सोमवारपासून म्हणजेच 31 ऑगस्टपासून या मालिकेची जागा ‘देवमाणूस’ ही सीरियल घेईल. याचे भयभीत करणारे प्रोमोज सध्या झी मराठी वाहिनीनवर दाखवले जात आहे. सत्य घटनेवर आधारित या मालिकेची कथा आहे. आज जरी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी, सर्वांच्या मनातली या मालिकेची स्पेशल जागा कायम राहिल आणि सर्व प्रेक्षक नक्कीच या मालिकेची आठवण काढतील.