रिया चक्रवर्तीला अश्लील भाषेत धमकी, दोघा इन्स्टाग्राम युझर्सविरोधात गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-32.jpg)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत धमक्या येत असल्याबाबत रियाच्या तक्रारीनंतर सांताक्रूझ पोलिसांनी दोघा इन्स्टाग्राम युझर्सवर कारवाई केली.
रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघा जणांनी अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर तिने सांताक्रूझ पोलिसात तक्रार नोंदवली होती. आता दोघा इन्स्टाग्राम युझरविरुद्ध एफआयआर नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
“आपल्याला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या, कारण सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येबद्दल आपल्याला दोष दिला जात आहे” अशी विनंती सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिने सायबर पोलिसांकडे केली होती. याआधीच तिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन कमेंट्स सेक्शन काढून टाकला आहे.